Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

वारी नाही....

By Manoj Deshmukh
वारी नाही....

वारी नाही बारी नाही दिसणार हरी नाही विठ्ठला रे तुझ्या विना दुसरा कैवारी नाही साल भर खपायचे वावरात झिजायचे एका दर्शनाने देवा दु:ख सारे जिरायचे पावसाच्या सरी माथी पाया खाली घाट वाट लाख लाख तूच सवे मैल गेले पटापट आला गाव गेला गाव खाणे पिणे तमा नाही मुखी नाव चित्ती रूप बाकी काही जमा नाही पाहताच शांत झाली काळजाची घालमेल दिसे रूप असे डोळा आनंदच खोल खोल काय पाप झाले देवा नाही आता परवणी घर झाले बंदीशाळा डोळ्या मध्ये जमा पाणी अंतरीची घालमेल नाही गेलो माहेराला विनवणी हीच माये तूच यावे भेटायाला

Read next