Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

सकाळी सकाळी

By Manoj Deshmukh
सकाळी सकाळी

कभिन्न काळा मेघ भरून आला बरसून गेला सकाळी सकाळी चहाच्या कपावर वाफेचा मनोरा तरी थंड आहे जरासा बुडाशी किती गर्द वाटे धुके दाटलेले दिसते न काही सकाळी सकाळी जरी खोल जावे मनाच्या तळाशी तरी आठवांचा न सुटे येरझारा एकांत निष्ठुर अशा दूरदेशी उभा खिडकीपाशी सकाळी सकाळी निष्पर्ण झाडे स्तब्ध गोठलेली जणू शोक करती ती पाने गळाली दिसले उभे दूर कुणी पाठमोरे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे भरून यावे तुला आठवावे पुन्हा ते नव्याने

Read next