Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

ती आली तर

By Manoj Deshmukh
ती आली तर

रंग किती गगनात पसरले ती आली तर मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर उभा असे मी बस थांब्यावर जाण्यासाठी कुठे जायचे तेच विसरले ती आली तर नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली भले भले ते ना सावरले ती आली तर मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला वाह का आपसूक उमटले ती आली तर मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर

Read next