Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · मार्च 2026 · २ मिनिटे

एक ना धड भाराभर चिंध्या — पण कदाचित हीच तुमची ताकद असेल

By Manoj Deshmukh
एक ना धड भाराभर चिंध्या — पण कदाचित हीच तुमची ताकद असेल

कधी पाईपपासून स्वतः बासरी बनवण्याचा प्रयोग… कधी AI वापरून काही कोडिंग प्रोजेक्ट्स… कधी घरी चीझ आणि पाव बनवणे तर कधी सामाजिक कामात वेळ देणं…

अशा प्रकारे माझ्या आवडी आणि छंद वेळोवेळी बदलत राहतात.

पूर्वी याबद्दल थोडी खंत वाटायची. आजूबाजूचे लोक नेहमी सांगायचे “कुठल्यातरी एकाच गोष्टीवर फोकस कर.”

ते ऐकून कधी कधी असं वाटायचं कदाचित आपण कशातच Expert होत नाहीये… कदाचित आपण थोडे Unfocused आहोत.

पण काही दिवसांपूर्वी “M-Shaped Personality” बद्दल वाचायला मिळालं, आणि एक वेगळा दृष्टिकोन समोर आला.

कदाचित अनेक आवडी असणं ही कमजोरी नसते. काही वेळा तीच एक वेगळी ताकद असू शकते.

आपण नेहमी एक अर्धवट म्हण ऐकतो

“Jack of all trades, master of none.”

पण तिचं पूर्ण वाक्य असं आहे

“Jack of all trades is a master of none, but oftentimes better than a master of one.”

म्हणजे अनेक क्षेत्रांची थोडीफार समज असणारा माणूस कधी कधी एकाच क्षेत्रातल्या तज्ञापेक्षाही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो.

_______________________ M-Shaped Mind म्हणजे काय?

“T-shaped” व्यक्ती एकाच क्षेत्रात खोलवर जाते.

पण M-shaped व्यक्तीकडे अनेक कौशल्यांचे वेगवेगळे स्तंभ असतात आणि त्या सगळ्यांना जोडणारा धागा असतो जिज्ञासा.

अनेकदा नवीन कल्पना इथेच जन्म घेतात जेव्हा एका क्षेत्रातील अनुभव दुसऱ्या क्षेत्रात वापरला जातो. मानसशास्त्रात याला “Far Transfer” म्हणतात.

_____________________________ Serial Mastery : जीवनाचे वेगवेगळे ऋतू

सगळं एकाच वेळी शिकायचा प्रयत्न केला तर थकवा येणं स्वाभाविक आहे.

त्याऐवजी आयुष्याकडे ऋतूंप्रमाणे बघितलं तर कदाचित अधिक समजतं.

कधीतरी एखादी कला शिकण्याचा टप्पा… कधीतरी तंत्रज्ञान शिकण्याचा टप्पा… कधीतरी समाजासाठी काम करण्याचा टप्पा…

एखादी गोष्ट मागे पडते असं वाटतं, पण प्रत्यक्षात ती पूर्णपणे हरवत नाही — ती पुढे कुठेतरी उपयोगी ठरते.

______________________________ Redundancy निसर्गातून मिळालेला धडा

निसर्गात redundancy म्हणजे सुरक्षितता.

उदाहरणार्थ — हत्तींना कॅन्सर खूप कमी प्रमाणात होतो, कारण त्यांच्या शरीरात कॅन्सरशी लढणाऱ्या gene च्या अनेक प्रती असतात.

मानवी जीवनातही अनेक कौशल्यं असणं कधी कधी अशीच लवचिकता (resilience) देतं.

उद्या एखादं कौशल्य अप्रासंगिक झालं, तरी दुसरा मार्ग शोधणं सोपं होतं.

____________________________

अर्धवट राहिलेले छंद किंवा बदलणाऱ्या आवडी कधी कधी अपयश वाटतात.

पण कदाचित ते अपयश नसतात.

ते फक्त आयुष्यातले वेगवेगळे “सेमिस्टर्स” असतात — जिथे प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकायला मिळतं.

काही लोक एका क्षेत्रात खोल जातात. तर काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रांना जोडण्याची भूमिका निभावतात.

दोन्ही मार्ग योग्य असू शकतात.

तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का — की तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी शिकायला आवडतात?

कॉमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

First published on Facebook.

Read next