एका बाजूला जगातली सर्वात मोठी कॉफी चेन Starbucks संकटात होती आणि दुसऱ्या बाजूला दोन बेडूक एका खड्ड्यात पडले होते.
काय घडलं होतं Starbucks मध्ये? Starbucks ने McKinsey मध्ये ट्रेन झालेला CEO नेमला आणि त्याने १७ महिन्यात जवळपास कंपनी संपवली ! कंपनीकडे हुशार CEO होता, मोठमोठ्या पदव्या होत्या, पण निकाल शून्य होता. कारण काय? निर्णय कागदावर भारी होते, पण दुकानात काय चाललंय हे कोणालाच माहित नव्हतं.
मग बदल झाला! कागदी घोडे नाचवणारा 'Consultant' गेला आणि जमिनीवर काम करणारा 'Operator' आला. रिझल्ट? फक्त ९० दिवसांत कंपनीने गमावलेली जादू पुन्हा मिळवली.
आता ती दोन बेडूकांची गोष्ट... दोन बेडूक खड्ड्यात पडले. वर उभे असलेले लोक ओरडत होते— "शक्यच नाही!", "बाहेर येणं कठीण आहे!", "तुम्ही थकून जाल पेक्षा अराम करा !".
पहिला बेडूक: लोकांचं ऐकून थकला आणि त्याने प्रयत्न सोडले.
दुसरा बेडूक: तो उड्या मारतच राहिला आणि अखेर बाहेर आला.
मजा म्हणजे, तो बेडूक बहिरा होता! त्याला वाटलं वरचे लोक त्याला प्रोत्साहन देतायत.
या दोन्ही गोष्टींतून आपण काय शिकतो? ✅ Execution > Intelligence: नुसती हुशारी कामाची नाही, प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. ✅ नकारात्मकता टाळा: जग तुम्हाला 'शक्य नाही' म्हणेल, पण तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. ✅ PowerPoint पेक्षा Floor महत्त्वाचा: एसी केबिनमध्ये बसून घेतलेल्या निर्णयांपेक्षा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घेतलेले निर्णय जास्त प्रभावी ठरतात.
थोडक्यात सांगायचं तर... आजूबाजूला सल्ले देणारे, शंका घेणारे आणि भीती घालणारे खूप असतील. प्रश्न एकच आहे— तुम्ही त्यांचं ऐकून खड्ड्यात बसून राहणार की 'त्या' बेडकासारखी जिद्दीने उडी मारणार?
लक्षात ठेवा: इतिहास 'बोलणाऱ्यांचा' नाही, तर 'करून दाखवणाऱ्यांचा' असतो! 🚀
