किती वाट मी तिची पाहिली येण्या साठी निरोप तिचाच, निघते आहे जाण्या साठी एक बाटली, जपून ठेवली उश्यापाशी चालून जाणे, नको कुटाणे पिण्या साठी सारे माझे, मला हवे हा विचार खोटा भरून पोट, न हात उठावे घेण्या साठी मीच चढावे, आंब्याच्या त्या झाडावरती कच्चे पक्के , रोज बहाणे खाण्या साठी राव नको, करुणेचा बाकी भाव पाहिजे शिल्लक असते नक्की थोडे देण्या साठी
