केले घाव फुलांनीच, मी पाहिले आहे प्रेमात कितीदा हे अश्रू , वाहिले आहे जुगारात जगण्याच्या, डाव लावला मोठा हातात शून्य ते बाकी, राहिले आहे शिकाऱ्यास कुठे उमजावे, कैद असे होणे काय जाळ्यात सावजाने , भोगिले आहे पुजले पाचवीस असेल, तुटणेच मनाचे लावणे जीव ते कुठे मी, त्यागिले आहे दोष यात काय द्यावा , मनोज सागराला ? वाळूचेच होते घर जे, मोडले आहे
