Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

एकदा येऊन जा

By Manoj Deshmukh
एकदा येऊन जा

चाललीस एकटीच मागुती पाहून जा पाहतो मी अजुन वाट एकदा येऊन जा अर्ध्यातून मैफलीस मोडणे न चांगले भैरवी बाकी अजुनी अंतरा गाऊन जा हवा होता अपुला संसार तुला नेटका टुमदार हे घर नवे एकदा राहून जा बरसतात घन निळे हे श्रावणात अंगणी थेंब थेंब घेत कवेत धुंद तू न्हाहुन जा वस्त्र फाटले नवे का देत कुणी टाकुनी कर धाग्यांसोबत करार नेटके शिऊन जा

Read next