Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · फेब्रुवारी 2026 · २ मिनिटे

बिनपायचा बेडूक आणि AI ची स्वीकृती

By Manoj Deshmukh
बिनपायचा बेडूक आणि AI ची स्वीकृती

एक स्वयंघोषित शास्त्रज्ञ बेडूक पकडतो. “उडी मार.” बेडूक उडी मारतो. तो एक पाय कापतो. “उडी मार.” उडी कमी होते — पण होते.

दोन पाय कापतो. उडी अजून कमी.

तीन पाय कापतो. बेडूक कसाबसा हलतो. चारही पाय कापतो. “उडी मार.” काहीच हालचाल नाही.

तो निष्कर्ष लिहितो: “चार पाय कापल्यावर बेडूक बहिरा होतो.”

चूक कुठे आहे? बेडूक बहिरा झाला नाही. निष्कर्ष चुकीचा आहे !

⸻

आज कॉर्पोरेट्स AI बाबत हाच प्रयोग करत आहेत

१५–२० वर्षांची अस्ताव्यस्त प्रक्रिया. कच्चा डेटा. स्पष्ट उद्दिष्ट नाही. मोजमाप नाही. कामाचे तुकडे नाहीत.

आणि मग घोषणा: “AI लावा सगळ्यावर!”

पहिल्याच दिवशी १००% परिणाम नाही?

निष्कर्ष: • “AI अजून तयार नाही.” • “हे फक्त हायप आहे.” • “ROI दिसत नाही.” • “हे आमच्यासाठी नाही.”

हा तंत्रज्ञानाचा अपयश नाही. ही विचारसरणीची चूक आहे.

AI हा स्विच नाही — तो गुणाकार आहे

कॉर्पोरेट मानसिकता काय असते? • १००% चाललं तरच यश • नाहीतर पूर्ण अपयश

हा बायनरी विचार सोडा. जर AI ने: • ३०% डॉक्युमेंटेशन कमी केलं • ४०% सपोर्ट क्वेरीज हाताळल्या • २५% विश्लेषण जलद केलं • ५०% डेटा वर्गीकरण ऑटोमेट केलं

तर तो अपयश नाही. तो फायदा आहे.

सुधारणा टप्प्याटप्प्याने होते. क्रांती एका दिवसात होत नाही.

परिपक्व दृष्टिकोन काय असतो?

शहाण्या कंपन्या काय करतात? 1. मोठं काम तुकड्यांत विभागते 2. पुनरावृत्तीची कामं वेगळी काढते 3. लहान प्रयोग करते 4. मोजमाप करते 5. सुधारत राहते

प्रश्न असा नसतो:

“AI पूर्ण विभाग बदलू शकतो का?”

प्रश्न असा असतो:

“या विभागातली कोणती ५ कामं आजच सुधारू शकतो?”

कडू सत्य: AI अपयशी नाही. अव्यवस्थित प्रयोग अपयशी आहेत.

तयारीशिवाय अपेक्षा वाढवल्या की निराशा येते.

AI जादू नाही. पण तो शक्तिशाली आहे — शिस्त असेल तर.

बेडूक बहिरा नव्हता. निरीक्षक अज्ञानी होता.

AI ला दोष देण्याआधी, स्वतःची रणनीती तपासा.

नाहीतर इतिहासात नोंद होईल — तुम्ही तंत्रज्ञान हरवलं नाही, तुम्ही संधी गमावली.

First published on Facebook.

Read next