Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · जानेवारी 2026 · २ मिनिटे

आपल्या लहानपणी “ऋण काढून सण करू नये”

By Manoj Deshmukh
आपल्या लहानपणी “ऋण काढून सण करू नये”

आणि “अंथरून पाहून पाय पसरावे” या तत्वांवर जगणारा भारतीय समाज म्हणून आपली ओळख होती.

पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपण परंपरागत बचत करणारे म्हणून ओळखले जायचो. पण आज हे चित्र झपाट्याने आणि धोकादायक पद्धतीने बदलत आहे.

आपण प्रगती करत आहोत की अंधानुकरण याचा प्रत्येक तरुणाने विचार करण्याची गरज आहे .

📱 आज भारतात घेतले जाणारे सुमारे ७०% iPhone हे EMI वर आहेत. ✈️ ३५% पेक्षा जास्त पर्सनल लोन हे फिरायला, हौसमौज आणि लाइफस्टाइलसाठी घेतले जात आहेत.

हे आकडे “स्टेटस सिम्बॉल” नाहीत. हे आर्थिक अस्वस्थतेचे रेड सिग्नल्स आहेत.

RBI च्या अलीकडील अहवालानुसार, • घरगुती कर्ज झपाट्याने वाढत आहे • तेही घर, व्यवसाय किंवा संपत्ती निर्माणासाठी नाही • तर फक्त उपभोग टिकवण्यासाठी (consumption)

दुसरीकडे वास्तव काय आहे? • नोकरी वाढीचा वेग गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे • वास्तविक पगार (महागाई वजा केल्यावर) सतत घटत आहेत • मध्यमवर्गासाठी खरी महागाई ८–९% दरवर्षी आहे

म्हणजे सरळ अर्थ असा — 👉 उत्पन्न थांबले आहे 👉 खर्च वाढतो आहे 👉 आणि फरक भरून काढायला कर्जाचा आधार घेतला जात आहे

कदाचित सोशल मीडिया याला कारणीभूत असेल ! वैयक्तिक कर्ज काही क्लिक वर उपलब्ध आहे

आज कुणाचंही यश, प्रवास, लक्झरी आयुष्य २४x७ आपल्या डोळ्यासमोर असतं. दिसतं ते खरं वाटतं — पण त्यामागचं EMI, कर्ज आणि मानसिक ताण दिसत नाही.

तरुण पिढी आज आनंद EMI वर घेत आहे, पण तोच EMI उद्याचा ताण होणार आहे.

हा प्रश्न फोन, गाडी किंवा सहलीचा नाही. प्रश्न आहे — ती आपल्या आर्थिक गणितात बसणारी आहे का?

कर्जाने सजवलेले आयुष्य दिसायला झगमगीत असतं, पण आतून पोकळ आणि अस्थिर असतं.

आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या शहाणपणाकडे वळण्याची वेळ आली आहे.

अंथरून पाहून पाय पसरावे. कारण ट्रडिशनल वीसडम मागासलेले नसते … ते अनेक पिढीच्या अनुभवातून आलेलं शहाणपण असते.

मानसिक आणि शारीरिक आरोग्या इतकेच आर्थिक आरोग्य ही महत्वाचे आहे

आजची योग्य बचत उद्याची ताकद असणार आहे !

©मनोज देशमुख manojdeshmukh@gmail.com

First published on Facebook.

Read next

मराठी

योग्य बिझनेस पार्टनर कसा निवडाल? – यशस्वी उद्योजकीय प्रवासासाठी काही महत्वाचे मुद्दे

व्यवसाय सुरू करणे हा एक रोमांचक प्रवास असतो. पण त्या प्रवासात योग्य बिझनेस पार्टनर मिळाला, तर गाडी वेगात आणि सरळ जाते. चुकला, तर आयुष्यभराचा धडा मिळतो. मी म्हणतो एक वेळ लग्न करताना पत्रिका जुळवली तरी चालेल पण बिझनेस…

मराठी

IT क्षेत्रात २०-२५ वर्षे काम केल्यावर नोकरी सोडण्याचा विचार करताय

IT क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर, मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली आहे: अनेक अनुभवी प्रोफेशनल्सना अचानक कॉर्पोरेट जगातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा होते. आणि खरं सांगायचं तर, यात त्यांची काहीच चूक नाही…