Skip to content
Manoj Deshmukh
All Marathi essays

मराठी निबंध · जून 2025 · ३ मिनिटे

पुस्तक सारांश: येथे मुलांना पंख फुटतात

By Manoj Deshmukh
पुस्तक सारांश: येथे मुलांना पंख फुटतात

१९६० च्या दशकात अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डेनियल ग्रीनबर्ग यांनी पारंपरिक शाळांच्या मर्यादा ओळखून मुलांच्या नैसर्गिक कुतूहलाला आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी नवीन प्रकारची शाळा सुरू केली. या शाळेत शैक्षणिक नियम, गुण, वर्ग यावर भर नव्हता; मुलांना स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार होता. शिक्षक फक्त मार्गदर्शक असत, ज्यामुळे मुलांमध्ये स्वावलंबन, जबाबदारी, आणि स्वतःच्या विकासाची जाणीव निर्माण झाली. हा शैक्षणिक प्रयोग पारंपरिक शिक्षण पद्धतींमध्ये सुधारणा करण्याचा एक आदर्श ठरला.

१. लोकशाही पद्धतीने निर्णय: मुलांना त्यांच्या शाळेतील निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार दिला जातो. २. मुलांच्या आवडी-निवडीचा सन्मान: विषय, शिक्षक, आणि साधने निवडण्याची स्वातंत्र्य मुलांना दिली जाते. ३. जबाबदारीची जाणीव: मुलांनी त्यांच्या कृत्यांची जबाबदारी स्विकारली पाहिजे, आणि चुका होऊनही त्यातून शिकावे. ४. मानसिक संतुलन: यश-अपयश दोन्हींचा उपयोग करून घेणारे तत्त्वज्ञान मुलांच्या मनात रुजवले जाते. ५. जबाबदार नागरिक होण्याची तयारी: शाळेत मुलांना जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचा संधी दिला जातो. ६. स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी: मुलांनी शिक्षण स्वतःच्या खांद्यावर घ्यावे. ७. मुक्त विचारांचे शैक्षणिक वातावरण: धाडसी आणि कल्पक लोकांनी अशा शाळा सुरू केल्याने पारंपरिक शाळांतील पोकळपणा उघड होतो. ८. स्वत:चे काम स्वतः करणे: मुलांना स्वावलंबी होण्याची शिकवण दिली जाते. ९. अंदरून प्रेरणा आणि ध्येय: मुलांच्या आतल्या उर्जेची जाणीव आणि निश्चित ध्येय असावे. १०. मनापासून शिकण्याचा महत्त्व: गणितसारख्या कठीण विषयातही एकच मुलगा मनापासून शिकत असेल, तर वेळ पुरेसा आहे. ११. शिक्षक-मुलांमधला करार: मुलांशी खुला संवाद आणि करार महत्वाचा आहे. १२. पाठ्यपुस्तकांची मर्यादा: कंटाळवाणे आणि विषयाशी फारसे संबंध नसलेले पुस्तक मुलांच्या शिकण्यात अडथळा. १३. स्वतंत्रतेची गरज: मुलांना स्वतःच्या निर्णयावर जगात स्थान मिळवायची गरज वाटते. १४. स्वतःहून शिकणे: वाचन-लेखन मुलांनी स्वतःहून आत्मसात करावे. १५. लहान मुलांकडून शिकणे: मोठ्यांनीही लहान मुलांकडून बरेच काही शिकावे लागते. १६. खेळाचे महत्त्व: खेळ हा शाळेचा अत्यंत आवश्यक भाग आहे. १७. शाळा वेळेच्या बंधनात नसते: मुलांना स्वसंयमाने आणि त्यांच्या गतीने शिकण्याची मुभा असते. १८. स्वतःच्या शोधासाठी वेळ: मुलांना त्यांचा स्व शोधण्यासाठी भरपूर वेळ दिला जातो. १९. सर्जनशीलतेचा गाभा: सर्जनशील लोक वेळेचे भान न ठेवता कामात लक्ष केंद्रीत करतात. २०. अलग-अलग शिकण्याचे मार्ग: प्रत्येक मुलाचा शिकण्याचा मार्ग वेगळा असतो. २१. शिकण्याचा कुतूहल: मुलांचे कुतूहल हे शिकण्याचे मुख्य साधन आहे. २२. कमी खर्चात शाळा चालवणे: अनेक कामे शिक्षक व मुले मिळून करतात, ज्यामुळे खर्च कमी होतो. २३. सडबरी व्हॅली स्कूलचा अनुभव: खूप कमी पैशात चालवलेली ही शाळा पर्यायी शिक्षणाचा आदर्श ठरते. २४. गरज ओळखणे आणि त्यानुसार काम: अभावांमध्येही पुढे जाण्याची प्रेरणा असावी. २५. प्रकल्पासाठी केलेले काम: प्रकल्प म्हणून केलेले कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. २६. खर्चाचे नीट नियोजन: खर्चावर नियंत्रण असले तरी आवश्यक तिथे खर्च करणे गरजेचे असते. २७. शाळेची सुरुवात आणि सहकार्य: पहिल्या वर्षी १२ लोकांनी पूर्णवेळ मोफत काम करून शाळा सुरू केली. २८. काम करणाऱ्यांची गरज: शाळेला आवश्यक ते काम करणारे लोक उपलब्ध असले पाहिजेत. २९. शिस्त आणि अनुभव: शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या शिस्तीने काम करतात. ३०. वेगवेगळ्या वयातील मुलांकडे वेगळे लक्ष देण्याचे नुकसान: अधिक वयक्तिक लक्ष दिल्याने मुलांच्या स्वावलंबनाला धोका होतो. ३१. मुलांना मोठ्यांसारखे वागवणे: मुलांना वेगळी वागणूक देण्याची गरज नसून त्यांना मोठ्यांसारखे वागवावे. ३२. यशस्वी व्यक्तिमत्त्वाची रचना: स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम. ३३. इच्छेने निवडलेला मार्ग: स्वेच्छेने निवडलेला शिक्षणाचा मार्गच खरी किंमत असतो. ३४. मुलांना मोठं बक्षीस: त्यांना ते स्वतः असू देणे हा मोठा आदर आहे.

Link to buy it online : https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5446772875192707897?BookName=Jithe-Mulaana-Pankh-Futattat

Read next

मराठी

तो/ती हुशार आहे… पण अभ्यास करत नाही!

पालकांची ही तक्रार आपण वारंवार ऐकतो. पण खरा प्रश्न आहे – जर मुलगा/मुलगी खरोखरच हुशार असेल, तर अभ्यास टाळण्यामागे कारण काय? 👉 कारण अनेकदा अभ्यास न करण्यामागे आळस नसून लादलेली करिअर निवड किंवा सहकाऱ्यांचा दबाव असतो. 👉…

मराठी

भारत: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार व्यवस्थेतील मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर

भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी घडामोडींमुळे रोजगार व्यवस्थेतील मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असलेल्या देशात, शिक्षणव्यवस्था तुलनेने दुर्बल…