Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

पन्नाशीचा टप्पा

By Manoj Deshmukh
पन्नाशीचा टप्पा

आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले दिसते आहे टक्कल पांढऱ्या झाल्या मिश्या हळू हळू मोठ्या होती कश्या प्रौढत्वाच्या रेषा शत्रूवर येऊ नये तो प्रसंग येतो असा तिशीची बाई म्हणते काका जागा आहे बसा पटापट हातातून आयुष्य जात पळून पन्नाशीचा टप्पा आला मागं पहावं वळून काय काय राहिलंय केली पाहिजे यादी काय माहित कधी धरावी लागेल गादी तू लक्ष नाही द्यायचे कुरबुर केली कुणी ऐकत बसावं मस्त आवडती गाणी जुनी कारणाशिवाय एक टाकून द्यावी रजा पोरा सोबत आपल्या खूप करावी मजा खर आहे घरासाठी तर झिझल पाहिजे एकदा सरीत पण चिंब भिजलं पाहिजे राहिलं असेल बघ ते डोंगरावर जाणं जुने छंद आठवून शिक चित्र किंवा गाणं प्रेमाला वय नसतं दे बायकोला गजरा व्हायचं रसिक कधी चुकवून त्या नजरा भरून घेतल आहे आता थोडं फार वाट मदतीचा हात थोडा ज्यांना दु:ख आहे दाट बाहेर बाहेर झालं तू आत पहा वाकून उलगडून बघ ते जे ठेवलस झाकून

Read next