एक दिवा इवलासा रोज रात्री पेटायचा अंधार ठेऊन स्वतः खाली प्रकाश मात्र वाटायचा मला नवल वाटायचे अन नाही कळायचे असे काही वागुन याला नेमके काय भेटायचे? मी त्याच्या जवळ गेलो आणि हा प्रश्न केला त्याने एका ओळीतच मला 'ब्रह्मोपदेश' दिला दुसऱ्यांसाठी जळण्यातलं सुख जेव्हा तुला कळेल "बुध्द" तेव्हा होशील तू अन तुला मोक्ष मिळेल....
