Skip to content
Manoj Deshmukh
All poems

कविता · मराठी

अविरत देणे

By Manoj Deshmukh
अविरत देणे

अविरत देणे हेच शिकावे वत्सल वृक्षापरी मधुर फळे ती पक्षी चाखीती घरट्या मधूनी पिले राखिती प्राण्यांसाठी बनून चारा पथिकाना तो दिला निवारा दूषित हवा ते स्वये घेऊनी परती केली प्राणवायू ने किती औषधी गुण देहाचे मूळ, खोड अन त्या पांनाचे सुकल्या फांद्या गळली पाने आता पालवी कुठे नव्याने? देण्यासाठी काही न उरले तरीही देणे नाही सरले काष्ट होऊनी चिता जाळीली अन प्रेता ते मुक्ती मिळाली

Read next